---- ‘शासन आपल्या दारी’ ----
How to Get - Income Certificate, Domicile Certificate, State Government Cast Certificate, Central Government Cast Certificate, State Government Non-Creamy Layer Certificate, Central Government Non-Creamy Layer Certificate, Central Government EWS Certificate, State Government EWs Certificate, Residence Certificate,
प्रशासन लोकाभिमुख व्हावे व तशी ओळख निर्माण व्हावी म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सरकार राबवत आहे.
जिल्ह्य़ातील नागरिकांना , कर्मचाऱ्यांना व विद्यार्थी मित्रांना सुविधा मिळाव्या त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने Shashan Aaplya Dari | शासन आपल्या दारी SETU SUVIDHA KENDRA हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
त्यालाच अनुसरून अमरावती जिल्यातील सेतू सेवा केंन्द्र चालकांनी शासन आदेश प्रमाणे कोरोना नियमाचे पालन व्हावे व नागरिकांना पण त्यांना पाहिजे त्या सुविधा कोरोना काळात मिळाव्या म्हणून Shashan Aaplya Dari | शासन आपल्या दारी SETU SUVIDHA KENDRA हा उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे.
Shashan Aaplya Dari | शासन आपल्या दारी SETU SUVIDHA Kendra कार्यक्रम रूपरेषा
नागरिकान कडून त्यांना हव्या असलेल्या दाखल्या साठी लागणारी ओरीजनल कागदपत्रे सुस्पस्ट पद्धतीने मागवून त्यांना संबंधित दाखल्याची पूर्तता दाखल्यासाठी लागणाऱ्या सरकारी वेळेत करून देण्याची योजना आहे.
Shashan Aaplya Dari | शासन आपल्या दारी SETU SUVIDHA Kendra
अटी व शर्ती -
१. सेतू केंद्र ज्याठिकाणी आहे अर्जदार हा त्याच तालुक्यातील असणे गरजेचे उदा. अर्जदार हा अमरावती तालुक्यातील असेल तर तो आपली कागदपत्रे फक्त अमरावती तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र येथे पाठऊ शकतो , अन्य तालुक्यातील अर्ज हे सदर सेतू केंद्र यांना मान्य नसतील.
२. अर्जदार ज्या तालुक्यातील आहे त्याचे आधार कार्ड , पेन कार्ड , मतदार कार्ड , ड्रायविंग लायसन्स किवा कोणतेही सरकारी फोटो आयडी वरील पत्ता हा त्याच तालुक्यातील असावा.
३. दाखला हा सरकारी नियम नुसार त्यासाठी लागणाऱ्या कालावधी मधेच मिळेल , अर्जंट मिळणार नाही.
४. गैर व्यवहार आढळून आल्यास संबंधित व्यति कार्यवाहीस पात्र ठरेल .
५. स्वयंघोषणा पत्र चा नमुना आपणास येथे PDF च्या माध्यमातून देण्यात येईल , त्याची प्रिंट काढावी व आपला फोटो चिकटवून व माहिती भरून तो स्कॅन करून किवा सुस्पस्ट पद्धतीने फोटो काढून पाठावावा. अर्जदार हा गाव रहिवासी असेल तर रहिवासी स्वयंघोषणा पत्र चा नमुना भरून पाठवावा.
६. रहिवासी दाखला हा संबंधित महानगर पालिका / नगर सेवक कडून आणावा , चालू वर्षाची TAX पावती चालेल सदर अहवाल हा चालू वर्ष मधीलच असावा अन्यथा तो ग्राह्य नसेल.
स्वयंघोषणा पत्र चा नमुना -
इथे DOWNLOAD करा CLICK HERE
- दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे -
उत्पन्न दाखला - (१ किवा ३ वर्षे करीता ) INCOME CERTIFICATE -
१. फॉर्म न १६ - खाजगी किवा सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तींसाठी
२. ITR (Income Tax Return) खाजगी नोकरी किवा उद्योगधंदे / व्यापारी
३. तलाठी अहवाल - कामगार, मोलमजुरी इतर
२. संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड (वडिलांचे)
३. अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित (वडिलांचे)
या मध्ये उत्पन्न दाखला हा १ किवा ३ वर्षे या करीता मिळेल दाखला ची वेलेडिटी हि १ वर्ष असेल , तलाठी अहवाल हा संबंधित तलाठी कडून आणावा , सदर अहवाल हा ५ दिवस पेक्षा जुना नसावा , स्वयंघोषणा पत्र चा नमुना आपणास येथे PDF च्या माध्यमातून देण्यात येईल , त्याची प्रिंट काढावी व आपला फोटो चिकटवून व माहिती भरून तो स्कॅन करून किवा सुस्पस्ट पद्धतीने फोटो काढून Whatsapp वर पाठावावा किवा केंद्र वर आणून द्यावा .
संबंधित दाखला मिळण्याचा सरकारी कालावधी १५ दिवस
वय अधिवास नागरिकत्व दाखला - (डोमेसाईल)
Age, Nationality and Domicile certificate -
१. अर्जदाराचे आधार कार्ड (अर्जदार १८ वर्षे पेक्षा कमी असल्यास वडिलांचे आधार कार्ड पण लागेल )
२. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र
३. महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)
४ .अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित
या मध्ये डोमेसाईल दाखला हा आजीवन कालावधी करीता मिळेल , रहिवासी दाखला हा संबंधित महानगर पालिका / नगर सेवक कडून आणावा , चालू वर्षाची TAX पावती चालेल सदर अहवाल हा चालू वर्ष मधीलच असावा अन्यथा तो ग्राह्य नसेल. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र या वर जन्म कुठे झाला म्हणजेच जन्म स्थळ चा उल्लेख तसेच जन्म तारीख चा उल्लेख हा असलाच पहिले अन्यथा ते ग्राह्य धरले जाणार नाही.
संबंधित दाखला मिळण्याचा कालावधी १५ दिवस
नॉन क्रीमीलेयर दाखला - Non Creamy Layer Certificate -
१. ३ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा हा सेतू वरून पहिले काढून घ्यावा )
२. आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
३. शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
४. मुलगा/मुलगी चा जातीचा दाखला
५. महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)
६. रेशन कार्ड (असल्यास)
७. अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित
या मध्ये नॉन क्रिमीलेयर दाखला हा कमीत कमी १ किवा जास्तीत जास्त ३ वर्षे कालावधी करीता मिळेल, हा दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा ३ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे. स्वयंघोषणा पत्र फोटो सहित वडिलांच्याच नावाने भरावे. अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे जातीचे प्रमाण पत्र असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून नॉन क्रिमीलेयर दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे. कागदपत्र मूळ सदर करावे .
संबंधित दाखला मिळण्याचा कालावधी २१ दिवस
जातीचा दाखला - (State Government महाराष्ट्रा साठी) State Caste Certificate - OBC, SC, ST, VJNT -
१. आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
२. शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
३. आजोबा TC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /शाळा प्रवेश नोंद वही उतारा /कोणताही महसूल पुरावा
४. महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)
५. रेशन कार्ड (असल्यास)
६. अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित
७. जात प्रमाण पत्र साठी शपथपत्र (नमुना २ व नमुना ३ )
८. वडील किवा नातेवाईक यांचा जात किवा जात वैधता प्रमाण पत्र (असल्यास)
या मध्ये जातीचा दाखला हा आजीवन कालावधी करीता मिळेल, हा दाखला काढताना सर्वात पहिले २ भाग पडतात .
क्रमाक ३ मधील नोंदवलेली आजोबा TC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /कोणताही महसूल पुरावा हि कागद पत्रे कोणत्या तालुक्यातील आहे ते तपासून बघावी , कागदपत्रे हि जाती नुसार OBC (वर्ष 1967 च्या पूर्वीचे) , SC ST (वर्ष1950 च्या पूर्वीचे) असणे आवश्यक आहे. संबंधित कागद हा २ सप्टेंबर २०१२ च्या शाषण निर्णय नुसार आजोबा TC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /कोणताही महसूल पुरावा हा ज्या तालुल्यातील असेल त्याच तालुक्यात दाखल किवा सादर करता येतो . अन्य कोणत्याही ठिकाणी तो सादर करता येणार नाही , कागदपत्र यावर संबंधित व्यक्तीचा व त्याच्या जातीचा स्पस्ट उल्लेख असावा.
संबंधित दाखला मिळण्याचा कालावधी २१ दिवस
सेन्ट्रल नॉन क्रीमीलेयर दाखला - Central Non creamy Layer Certificate -
१. ३ वर्षाचा उत्पन्न दाखला
२. आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
३. शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
४. मुलगा/मुलगी चा जातीचा दाखला
५. महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)
६. रेशन कार्ड (असल्यास)
७. अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित
या मध्ये सेन्ट्रल नॉन क्रिमीलेयर दाखला हा जास्तीत जास्त १ वर्षे कालावधी करीता मिळेल, हा दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा ३ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे. स्वयंघोषणा पत्र फोटो सहित वडिलांच्याच नावाने भरावे. अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे जातीचे प्रमाण पत्र असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून सेन्ट्रल नॉन क्रिमीलेयर दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे.
संबंधित दाखला मिळण्याचा कालावधी २१ दिवस
सेन्ट्रल जातीचा दाखला - Central Caste Certificate -
१. ३ वर्षाचा उत्पन्न दाखला
२. आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
३. शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
४. मुलगा/मुलगी चा जातीचा दाखला
५. महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)
६. रेशन कार्ड (असल्यास)
७. अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित
या मध्ये सेन्ट्रल जातीचा दाखला हा जास्तीत जास्त १ वर्षे कालावधी करीता मिळेल, हा दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा ३ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे. स्वयंघोषणा पत्र फोटो सहित वडिलांच्याच नावाने भरावे. अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे जातीचे प्रमाण पत्र असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून सेन्ट्रल जातीचा दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे.
संबंधित दाखला मिळण्याचा कालावधी २१ दिवस
सेन्ट्रल EWS १० टक्के आरक्षण दाखला -
Central EWS Certificate 10% Reservation -
१. आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
२. शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
३. आजोबा TC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /शाळा प्रवेश नोंद वही उतारा /कोणताही महसूल पुरावा
४. महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)
५. रेशन कार्ड (असल्यास)
६. अर्जदार स्वयंघोषणा पत्र (फोटो सहित ) (वडील व लाभार्थी दोघांचेही )
७. जात प्रमाण पत्र साठी शपथपत्र (नमुना २ व नमुना ३ )
८. वडील किवा नातेवाईक यांचा जात किवा जात वैधता प्रमाण पत्र (असल्यास)
९ . Online स्वयंघोषणा पत्र (हे महा ई सेवा केंद्र किवा सेतू मधून मिळेल )
१०. १० % मराठी प्रतिज्ञा लेख (हे महा ई सेवा केंद्र किवा सेतू मधून मिळेल )
११. १० % इंग्लिश प्रतिज्ञा लेख (हे महा ई सेवा केंद्र किवा सेतू मधून मिळेल )
या मध्ये सेन्ट्रल EWS दाखला हा जास्तीत जास्त १ वर्षे कालावधी करीता मिळेल, हा दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा १ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे. स्वयंघोषणा पत्र फोटो सहित वडिलांच्याच नावाने भरावे. अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे १९६७ पूर्वीचा पुराव्वा असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून सेन्ट्रल EWS Certificate दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे.
संबंधित दाखला मिळण्याचा कालावधी २१ दिवस
स्टेट EWS १० टक्के आरक्षण दाखला -
State EWS Certificate 10% Reservation -
१. आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
२. शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )
३. आजोबा TC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /शाळा प्रवेश नोंद वही उतारा /कोणताही महसूल पुरावा
४. महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)
५. रेशन कार्ड (असल्यास)
६. अर्जदार स्वयंघोषणा पत्र (फोटो सहित ) (वडील व लाभार्थी दोघांचेही )
७. जात प्रमाण पत्र साठी शपथपत्र (नमुना २ व नमुना ३ )
८. वडील किवा नातेवाईक यांचा जात किवा जात वैधता प्रमाण पत्र (असल्यास)
९ . Online स्वयंघोषणा पत्र (हे महा ई सेवा केंद्र किवा सेतू मधून मिळेल )
१०. १० % मराठी प्रतिज्ञा लेख (हे महा ई सेवा केंद्र किवा सेतू मधून मिळेल )
११. १० % इंग्लिश प्रतिज्ञा लेख (हे महा ई सेवा केंद्र किवा सेतू मधून मिळेल )
या मध्ये स्टेट म्हणजे राज्यसरकार चा EWS दाखला हा जास्तीत जास्त १ वर्षे कालावधी करीता मिळेल, हा दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा १ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे. स्वयंघोषणा पत्र फोटो सहित वडिलांच्याच नावाने भरावे. अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे १९६७ पूर्वीचा पुराव्वा असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून स्टेट म्हणजे राज्यसरकार चा EWS दाखला EWS Certificate दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे.
संबंधित दाखला मिळण्याचा कालावधी २१ दिवस
रहिवासी दाखला - Residence Certificate -
१. अर्जदाराचे आधार कार्ड (अर्जदार १८ वर्षे पेक्षा कमी असल्यास वडिलांचे आधार कार्ड पण लागेल )
२. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र
३. महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)
४ .अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित
या मध्ये रहिवासी दाखला हा १ वर्षे कालावधी करीता मिळेल , रहिवासी दाखला हा संबंधित महानगर पालिका / नगर सेवक कडून आणावा , चालू वर्षाची TAX पावती चालेल सदर अहवाल हा चालू वर्ष मधीलच असावा अन्यथा तो ग्राह्य नसेल. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र या वर जन्म कुठे झाला म्हणजेच जन्म स्थळ चा उल्लेख हा असलाच पहिले अन्यथा ते ग्राह्य धरले जाणार नाही.
संबंधित दाखला मिळण्याचा कालावधी १५ दिवस
ST Bus SMART CARD - एस टी बस हाफ तिकीट कार्ड
१. अर्जदाराचे आधार कार्ड (अर्जदार ६५ वर्षे किवा त्यापेक्षा अधिक असावा )
२. मतदान कार्ड (असल्यास)
(ऑनलाईन प्रक्रीये मध्ये आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे , नसल्यास आपण केंद्रावर येऊन नोंदणी करू शकता )
या मध्ये स्मार्ट कार्ड हे १ वर्ष कालावधी करीता मिळेल , सदर कार्ड १ वर्ष संपल्या नंतर पून्हा RENEW करता येईल. सदर कार्ड करीता अर्जदार ६५ वर्षे (पेन्शनर किवा ६५ वर्षे वय वरील कोणीही वृद्ध व्यक्ती )किवा त्यापेक्षा अधिक त्याच्या आधार कार्ड वरील जन्म तारखे नुसार असावा. सदरचे कार्ड आपणाला महाराष्ट्र राज्य च्या हद्दीत कोणत्याही राज्य परिवहन महामंडळ याच्या बस मध्ये मुदतीनुसार अर्धे तिकीट साठी वापरण्यात येईल.
यात कार्ड नवीन काढणे , कार्ड मुदत वाढवणे (Renew card) , कार्ड रिचार्ज करणे , ST पासेस (सर्विस पास , विद्यार्थी पास , आवडेल तिथे प्रवास पास ) बनवणे हि कामे होतील.
संबंधित कार्ड मिळण्याचा कालावधी १ ते २ महिने
____________________________________________________
__________________________________________________________________________________
वैभव ट्रेडर्स एंड सेतु सुविधा केंद्र , अमरावती
ब्लॉग और सोशल मिडिया पर हमसे जुडे .
नयी सरकारी योजनाए और जानकारी , सीएससी , सेतु एवं महा ई सेवा केंद्र सम्बंधी नए अपडेट्स अब घर बैठे एक क्लिक पर.
पसंद आये तो LIKE, SHARE , FOLLOW और COMMENT ज़रूर करे
-कृपया हमसे जुडे
No. | Social Media | Subscribe Us |
---|---|---|
1. | Blog & Website | Click Here |
2. | Facebook Page | Click Here |
3. | Google Search | Click Here |
4. | Telegram Channel Group | Click Here |
5. | Whatsapp Chat | Click Here |
6. | Twitter Handle | Click Here |
7. | Youtube Channel | Click Here |
8. | Click Here | |
9. | Follow Blog | Click Here |
10. | Google Reviews | Click Here |
11. | Google Location | Click Here |
12. | Facebook Public Group | Click Here |
13. | India Mart Catalog | Click Here |
14. | Just Dial Catalog | Click Here |
15. | Whatsapp Catalog | Click Here |
कृपया शेयर करे और दुसरो को मदत करे.
वैभव ट्रेडर्स एंड सेतु सुविधा केंद्र , अमरावती
ब्लॉग और सोशल मिडिया पर हमसे जुडे .
नयी सरकारी योजनाए और जानकारी , सीएससी , सेतु एवं महा ई सेवा केंद्र सम्बंधी नए अपडेट्स अब घर बैठे एक क्लिक पर.
पसंद आये तो LIKE, SHARE , FOLLOW और COMMENT ज़रूर करे.
Blog & Website - https://setumitra.blogspot.com/?m=1
Facebook page - https://www.facebook.com/setuamravati
Google search - https://g.co/kgs/hHNk6s
Google Location - https://goo.gl/maps/73iXGLRS8MPMc7a59
Google Review - https://g.page/setuamravati/review
Whatsapp Chat - https://wa.me/918208776568
Facebook group - https://www.facebook.com/groups/vaibhavtraders/
Pinterest - https://www.pinterest.com/setumitra
Twitter - https://twitter.com/setuamravati
Youtube Channel - https://www.youtube.com/channel/UCpxocPgCd7PvsR8PItoJluw
India Mart Catalog - https://www.indiamart.com/vaibhav-traders-setu-suvidha-kendra/
Just Dial Catalog - https://www.jdmart.com/GOJ-QFV1619097090?skip
Whatsapp Catalog - https://wa.me/c/918208776568
Facebook Public Group (Amravati Business UP TO DATE)
कृपया शेयर करे और दुसरो को मदत करे.