महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ( एस. टी. बस ) अर्धे तिकीट सवलत कार्ड तसेच पासेस सुविधा
SMART CARD LATEST UPDATE
जेष्ठ नागरिकांसाठी खुश खबर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्या वतीने ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधारकार्डापासून सुटका होणार असून, त्यांच्या हाती स्मार्ट कार्ड येणार आहे. विशेष म्हणजे, या स्मार्ट कार्डला रिचार्ज केले तर प्रवाशांना प्रवासा दरम्यान पैसेही बाळगण्याची गरज राहणार नाही.
सुरक्षित प्रवास म्हणून अनेकजण बसद्वारे प्रवास करण्याला पसंती देतात. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवास करताना ज्येष्ठांना तिकिटाच्या दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा बसद्वारे प्रवास करण्याकडे अधिक कल असतो. राज्य परिवहन महामंडळाने ‘डिजिटलायझेशन’ स्वीकारून ‘स्मार्ट कार्ड’ ची योजना आमलात आणली आहे. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना 50*-70*-100*(शुल्का बद्दल शाश्वती नाही) रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. आॅनलाईन नोंदणीनंतर त्यास आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे. त्यानंतर 1 महिन्यात संबंधितांना ‘स्मार्ट कार्ड’ ज्या अधिकृत एजेंट तर्फे किवा आगारातर्फे देण्यात येत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोठे व किती किलोमीटरचा प्रवास केला, याची माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी ज्येष्ठांसाठी अर्ध्या तिकीट दरावर ४ हजार किलोमीटर प्रवासाची मर्यादा होती. मात्र, केवळ मतदान कार्ड, आधार कार्ड पाहून प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. कोणी किती प्रवास केला, याची माहिती महामंडळाला मिळू शकत नव्हती. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड मशिनद्वारे स्वाईप करून प्रवास केल्यानंतर प्रवाशांच्या किलोमीटरची माहिती महामंडळाकडे संकलित होणार आहे. वर्षाच्या आत ४ हजार किलोमीटरची मर्यादा संपली तर मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकाला तिकिटाचा पूर्ण दर देऊन प्रवास करावा लागणार आहे.
वर्षाला नूतनीकरण होणार
१ एप्रिल ते ३१ मार्च या एक वर्षाच्या कालावधीसाठी स्मार्ट कार्डची मुदत राहणार आहे. त्यामुळे मुदत संपली की प्रत्येक वर्षी या स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करावे लागणार आहे. कार्ड हरवले किंवा खराब झाले तर शुल्क भरल्यानंतर संबंधितांना नूतन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.
बोगसगिरीला बसणार आळा
बनावट कागदपत्रे दाखवून बसप्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. अनेकांवर यापूर्वी कारवाईही झाली आहे. आता स्मार्ट कार्ड योजना लागू केल्याने बसप्रवासादरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे.
आधारकार्ड, मतदानकार्ड चालणार
स्मार्ट कार्डची आगारनिहाय अधिकृत एजेंट द्वारे नोंदणी केली जात आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही त्यांच्याकडील मतदान कार्ड, आधारकार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकिटाद्वारे तूर्तास प्रवास करू दिला जाणार आहे. शासनाने भविष्यात स्मार्टकार्ड सर्वांना बंधनकारक केले तर मात्र ही कागदपत्रे चालणार नाहीत.
कागदपत्रे
आपले *आधार कार्ड* व *मतदान कार्ड* किंवा *मतदान कार्ड घेऊन आपणास जावे लागेल. स्वतःचा मोबाईल नेण्यास विसरू नये.
पासेस
स्मार्ट कार्डची आगारनिहाय अधिकृत एजेंट द्वारे नोंदणी केली जात आहे तसेच या एजेंट द्वारे आपणास विविध प्रकारच्या बस पासेस सुद्धा उपलब्ध होणार आहे त्यात सर्विस पास , विद्यार्थी पास , आवडेल तिथे प्रवास पास या आणि या प्रकारच्या महामंडळ तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व पासेस सुद्धा त्या संबंधीत अधिकृत केंद्र निहाय मंडळाने ठरवून दिलेल्या दारात उपलब्ध असतील . नागरिकांनी याचा आपल्या आगारात गर्दी न करता आपल्या आगारनिहाय अधिकृत एजेंट द्वारे नोंदणी करून लाभ घ्यावा.
रिचार्ज
आपण बनवून घेतलेल्या पासेस किवा कार्ड आपण आपल्या आगारनिहाय अधिकृत एजेंट द्वारे रिचार्ज किवा नूतनीकरण त्यासाठी लागणाऱ्या योग्य त्या दारात करून घेऊ शकता .
- आरोग्य सेतू एप कैसे इस्तेमाल करे ?
- खुदका कोरोना मास्क घरपे कैसे बनाये ?
- किसान क्रेडीट कार्ड - जाने संपूर्ण प्रक्रिया 2020 ?
- जाने कैसे बनता है हाफ टिकट एस .टी . पास ? क्या दास्तेवज चाहिये ? कैसे आवेदन करे ?
- जाने क्या है स्वावलंबन कार्ड ? कैसे पाये इसका लाभ ? नयी योजना 2020 ?
- fastag क्या है ? क्या ये हमे लगाना जरुरी है ? पुरी जानकारी
- नयी सरकारी योजना के बारे मे जाने , लाईक करे इस फेसबुक पेज को .
वैभव ट्रेडर्स एंड सेतु सुविधा केंद्र , अमरावती
ब्लॉग और सोशल मिडिया पर हमसे जुडे .
नयी सरकारी योजनाए और जानकारी , सीएससी , सेतु एवं महा ई सेवा केंद्र सम्बंधी नए अपडेट्स अब घर बैठे एक क्लिक पर.
पसंद आये तो LIKE, SHARE , FOLLOW और COMMENT ज़रूर करे
Blog & Website - https://setumitra.com
Facebook page - https://www.facebook.com/setuamravati
Google search - https://g.co/kgs/hHNk6s
Google Location - https://goo.gl/maps/73iXGLRS8MPMc7a59
Google Review - https://g.page/setuamravati/review
Whatsapp Chat - https://wa.me/918208776568
Facebook group - https://www.facebook.com/groups/vaibhavtraders/
Pinterest - https://www.pinterest.com/setumitra
Twitter - https://twitter.com/setuamravati
Youtube Channel - https://www.youtube.com/channel/UCpxocPgCd7PvsR8PItoJluw
India Mart Catalog - https://www.indiamart.com/vaibhav-traders-setu-suvidha-kendra/
Just Dial Catalog - https://www.jdmart.com/GOJ-QFV1619097090?skip
Whatsapp Catalog - https://wa.me/c/918208776568
Facebook Public Group (Amravati Business UP TO DATE)
कृपया शेयर करे और दुसरो को मदत करे.
Tags:
Government Scheme